खालीलप्रमाणे ताम्हिणी घाट येथे आज घडलेल्या दुर्दैवी अपघाताची सविस्तर माहिती
ताम्हिणी घाट म्हणल कि आपल्याला आठवतो तो निसर्गरम्य असा घाट. मोठं मोठे धबधबे आणि वळणा वळणाचे रस्ते. अनेक जण सुट्टी ची मजा घेण्यासाठी ताम्हिणी घाटात जण पसंद करतात. या घाटात असे बरेच स्पॉट आहेत जे पर्यटकांना आकर्षीत करतात. परंतु याच ताम्हिणी घाटात गेल्या काही दिवसात अनेक अपघाताच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. असाच एक अपघात आज महिंद्रा थार गाडीचा घडला आणि त्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. वळण वळणाचे रस्ते जरी निसर्गरम्य वाटत असले तरी वेगावर मर्यादा नसेल तर हेच रस्ते मृत्यूचे सापळे बनतात हेच यातून सिद्ध होतंय.
नवले ब्रिज अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हि आहेत त्याची कारणे आणि उपाय
अपघाताची घटना आणि ठिकाण
आज ताम्हिणी घाटातील पुणे–माणगाव महामार्गावर एका महिंद्रा थार या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातात वाहन एका तीव्र वळणावरून ५०० फूट खोल दरीत कोसळल्याचे समजते. वाहन चालकाच्या ताब्याबाहेर गेल्याने वळणावरून खोळंबून दरीत कोसळल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
या अपघातात पाच जणे जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे.आणखी काही लोक बेपत्ता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून बचावकार्य सुरु आहे.
ताम्हिणी घाट हे दृश्यरम्य असले तरी रस्त्याची स्थिती, वळणांची संख्या आणि धुक्यामुळे कमी दृश्य-क्षमता यांसारख्या कारणांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घटनास्थळी वाहनाचे अवशेष व खोल दरीमुळे बचाव व मृतदेह बाहेर काढणे खूप कठीण झाले आहे. या कामासाठी क्रेन, दोरखंड व ड्रोन यांचा वापर करून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
बिहार ची जनता खरंच मतदानासाठी जागरूक झाली का? का योजनांच्या आमिषांना बळी पडली?
सावधगिरीचे महत्त्व
या प्रकारच्या घातक अपघातांमुळे खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
घाटातील वळणावर वाहन चालवताना वेग कमी ठेवावा.
कमालीचा धुके किंवा पाऊस असेल तर शक्यतो प्रवास टाळावा.
प्रवासासाठी जाण्यापूर्वी गाडीची स्थिती (ब्रेक, टायर इ.) तपासणे अत्यावश्यक.
ठिकाणांची माहिती नसल्यास किंवा रात्री प्रवास करत असल्यास अधिक दक्षता घेणे आवश्यक.
अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा