बिहार ची जनता खरंच मतदानासाठी जागरूक झाली का? का योजनांच्या आमिषांना बळी पडली?

बिहार ची जनता खरंच मतदानासाठी जागरूक झाली का ? का योजनांच्या आमिषांना बळी पडली ? हि गोष्ट खरच विचार करण्यासारखी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बिहार मध्ये पाहिलांदाच हे घडल आहे.

आता पर्यंत काय झाला.

बिहार भारतातला असा राज्य आहे ज्याचा इतिहास खूप मोठा राहिला आहे. पण स्वातंत्र्यानंतर बिहार नेहेमी एक मागासलेला राज्य राहिला आहे. बिहार मध्ये दारिद्र्याच प्रमाण नेहेमी जास्त राहिला आहे. त्याचा सर्वात मोठ कारण तिथे असलेल राजकारणी लोक जे फक्त स्वतः चा विचार करत राहिले. तिथे असलेली गुंडांची दहशत. १९५१-५२ च्या विधानसभा मतदानाच्या आकडेवारी अनुसार बिहार मध्ये ४२.६% मतदान झाला होत . जे आता पर्यंत इतिहासातल सर्वात कमी मतदान होता. २००० साली सर्वात जास्त मतदानाची नोंद झाली होती ६२.५७%. पण ह्या वर्षी झालेल्या विधानसभा च्या पहिल्या टप्यात मतदान ने विक्रमी नोंद केली. ह्या वेळेस पहिलाच टप्यात ६५.०८% मतदानाची नोंद झाली.

हा बदल का ?

पुण्याजवळील पर्यटन स्थळांना पर्यटकांची मोठी गर्दी 

२०२० मध्ये विधानसभा च्या वेळेस ५७.२९% मतदान झाल होत. अचानक एवढा मोठा बदल कसा काय झाला? गेल्या काही दिवसापासून मतदानाचा प्रचार सुरु आहे. सगळ्याच नेत्यांची भाषणे आणि त्यांची आश्वासने ऐकायला भेटली. गेल्या २० वर्षा पासून भाजप आणि जनता दल ची सरकार आहे. पण बिहार मध्ये जास्त बदल घडला नाही. काही दिवसापासून आपण पहात आहोत जसा महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी योजने चा मतदानाच्या वेळेस फायदा झाला . तसाच फायदा आता बिहार च्या मतदानाच्या वेळी व्हावा म्हणून आताच्या सरकार ने महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी १०००० महिना देण्याचा घोषित केला आहे. हे करण कितपत योग्य आहे.

निवडणूक आयोग च्या मते सुद्धा मतदारांची नोंद वाढली हि एक चांगली गोष्ट आहे. पण निवडणुकीच्या आधी अश्या योजनांच्या घोषणा करणे कायद्याने गुन्हा आहे. पण निवडणूक आयोग ह्या कड़े डोळेझाकुन बघत असल्या सारखा दिसतो. निवडणूक आयोगाने महिलांचा वाढता सहभाग चा फोटो पण सादर करत कौतुक केल आहे. पण जर ह्या योजनांच्या अमिषाला बळी पडून लोक मतदान करत असतील तर ते एक प्रकारचा मतदान विकत घेण्यासारखा झाल.

पुण्याजवळील पर्यटन स्थळांना पर्यटकांची मोठी गर्दी 

जनते ला खर काय पाहिजे ?

आपण कधी पण बिहार राज्याच नाव घेतो तेंव्हा आपल्याला नेहेमी तिथली गरिबी आणि गुंडागर्दी आठवते. बिहार ची जनता तिथे असलेले बाहुबली च्या विरुद्ध बोलण्याचा कधीच विचार करू शकत नाहीत. कारण तिथं दिवसा माणसांची हत्या केली जाते. आणि नाही त्याबद्दल कुठे तक्रार नोंद होते . ना कुणाला कधी न्याय भेटतो. बिहार राज्यात जवळपास ५७% रुग्णालयांची कमतरता आहे. तिथे पुरेसा रोजगार पण नाही. म्हणून तिथे राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करावं लागत. भारतातली सर्वात जुनी नालंदा युनिव्हर्सिटी ज्या राज्यात होती. आज त्याच राज्यातील लोकांना नाही चांगली शाळा, नाही हॉस्पिटल. त्यांना त्यांच आयुष्य सुधारण्यासाठी चांगल्या सरकार ची गरज आहे. जे खरंच त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावतील . नाही कि अशा लोकांचा जे निवडणुकी साठी त्यांचा फायदा घेतील आणि परत त्यांना त्याच आवस्थेत ठेवतील.

Shere me