नवले ब्रिज अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हि आहेत त्याची कारणे आणि उपाय

नवले ब्रिज अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हि आहेत त्याची कारणे आणि उपाय
नमस्कार मित्रानो पुण्यातील नवले ब्रिज चा नाव निघालं कि आपल्याला सगळ्यात आधी आठवत ते म्हणजे इथे होणारे वारंवार अपघात. गेली कित्येक वर्षे हि अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकताच झालेल्या अपघातामध्ये ८ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या आधीच्या अपघातांमध्ये देखील असेच कधी ५ कधी ७ तर कधी १० अश्या मोठं मोठ्या आकड्यांमध्ये लोकांचा मृत्यू झालाय. कधी जीवित हानी नाही झाली पण गाड्या एकमेकांवर आदळून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपण पहिले. अनेक वेळा बरेच जण गंभीर रित्या जखमी देखील झाले. पण या अपघाताचे नेमके कारण काय आहे हे अद्याप कोणाच्याही लक्षात आलेलं नाहीये .

बरेच जुने लोक सांगतात कि या ठिकाणी अगोदर श्मशानभूमी होती आणि हायवे चे काम करण्यासाठी रस्त्यात येणारी स्मशानभूमी हटवल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

बिहार ची जनता खरंच मतदानासाठी जागरूक झाली का? का योजनांच्या आमिषांना बळी पडली? 

अनेक लोकांचं अस म्हणणं आहे कि कात्रज बोगद्यातून निघाल्यापासून नर्हे पर्यंत येईपर्यंत सर्व उतार आहे आणि या उतारावर गाड्यांचे ब्रेक फेल झाल्यामुळे असे अपघात घडत आहेत. पण असे उतार तर इतरही ठिकाणी याही पेक्षा जास्त उतार आहेत मग त्याठिकाणी असे वारंवार अपघात का नाहीत घडत हे देखील बघणं तितकाच महत्वाचे आहे.

उतार असल्यामुळे पोलीस यंत्रणेकडून विविध ठिकाणी वेगमर्यादा घालून दिलेल्या आहेत. रोड वर पांढरे पट्ट्यांचे स्पीड ब्रेकर बसवून गाड्यांच स्पीड कमी करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. पण तरीही येथील अपघाताची मालिका काय थांबायला तयार नाही.

पुण्याजवळील पर्यटन स्थळांना पर्यटकांची मोठी गर्दी

आणखी एक कारण अस समोर आला आहे ते म्हणजे नेहमी अपघात होतात त्या ट्रक, कंटेनर किंवा ट्रेलर हे इतर राज्यातले असतात. ज्यांना येथील उताराची कल्पना नसते आणि डिझेल वाचविण्याच्या नादात हे लोक गाडी न्यूट्रल करतात. यांची गाडी कात्रज बोगद्यापासून उतार असल्यामुळे आरामात नर्हे पर्यंत येते. आणि समोर असलेल्या गर्दीची त्यांना कल्पना नसते, न्यूट्रल गाडी ला असताना अचानक ब्रेक दाबल्यामुळे अनेक गाड्यांचे ब्रेक फेल होत आहेत. म्हणजेच या इतर राज्यातून येणाऱ्या कंटेनर , ट्रक थोड्याशा डिझेल वाचविण्याच्या नादात असे मोठ-मोठे अपघात घडवतात असा देखील तज्ज्ञांचे मत आहे.

यावरील उपाय
यावर उपाय म्हणजे कोणत्याही परिस्तिथी मध्ये कुठेही उतार असो किंवा नसो आपली गाडी न्यूट्रल करायची नाही.
पोलीस डिपार्टमेंट नि सांगितलेल्या वेग मर्यादा याचा तंतोतंत पालन केला पाहिजे.

अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा 

Shere me