सांगली च्या १० वि मध्ये शिकणाऱ्या शौर्यने का केली आत्महत्त्या

सांगली च्या १० वि मध्ये शिकणाऱ्या शौर्यने का केली आत्महत्त्या.दिल्लीतील आघाडीच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या करण्यापूर्वी 16 वर्षीय शौर्यने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये शिक्षकांना जबाबदार ठरवले आहे. या घटनेनंतर आज सकाळी पालकांनी शाळेबाहेर मोर्चा काढून न्यायाची मागणी केली.

या मुलाच्या वडिलांनी तीन शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांनी इतका छळ केला की मुलाला आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.

सुसाईड नोटमध्ये शौर्यने लिहिले होते:
“सॉरी आई… मी आधीही तुला अनेकदा दु:ख दिले. पण हा शेवटचा वेळ आहे. या शाळेतले शिक्षक असेच आहेत. आता मी काय बोलू?”

या संदर्भात दिल्ली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ताम्हिणी घाट येथे आज घडलेल्या दुर्दैवी अपघाताची सविस्तर माहिती

शौर्यच्या वडिलांनी या आत्महत्येस पूर्णपणे शिक्षकांना जबाबदार धरलं असून त्या सांगितले कि माझा शिक्षकांसोबत बोलणे झालं होत कि माझा मुलगा खोडकर होता, थट्टा-मस्करी करतो पण तो लहान आहे अजून थोडंफार करेल. पण तुम्ही लक्ष ठेवा, असा सांगूनही शिक्षकांनी त्याला टार्गेट कारण बंद केला नाही. आणि त्याला त्रास देणं सुरूच ठेवलं.”

शौर्यच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार आला १० वि ची परीक्षा संपायला खूप कमी दिवस राहिले आहेत. आणि एकदा तुझी १० वि झाली कि आपण शाळा बदलणार होतो असा त्यांनी शौर्य ला प्रॉमिस केला होता. पण तीन दिवसांपूर्वी त्याचे शिक्षक त्याला म्हणाले कि तुझं पीसी (राखीव प्रमाणपत्र) देऊन तुला शाळेतून काढून टाकू. परीक्षेच्या काही दिवस आधी अशा धमक्या दिल्या तर मुलाच्या मनावर काय परिणाम होईल हे आपण समजू शकतो.”

“ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली, त्या दिवशी शाळेत घसरून पडला. पण मॅडम म्हणाल्या— तू मुद्दाम पडलास. त्याने सांगितलं मी मुद्दाम नाही पडलो. आणि तो रडू लागला. अशा प्रकारचे प्रसंग शौर्यच्या वडिलांनी शेयर केले आहेत.

नवले ब्रिज अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. हि आहेत त्याची कारणे आणि उपाय

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट निधी आनंद यांचे मत

“मुलं अचानक एकटं राहू लागली, कमी झोप, भूक कमी-जास्त होणे, चिडचिडेपणा, भीती वाटणे, वागणुकीत अचानक बदल जाणवणे. अशा वेळी पालकांनी त्वरित लक्ष द्यायला हवं.” शाळा आणि घर हे दोन्ही वातावरण मुलांसाठी महत्त्वाचे असते. मुलाला शाळेत सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे. शिक्षकांनी त्याचे ऐकले पाहिजे, सल्लागारांची मदत घ्यायला हवी आणि बुलिंग थांबवायला हवं.”

अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा

Shere me