मोतिबिंदू ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेन्सचे प्रकार : नागरिकांसाठी संपूर्ण माहिती

मोतिबिंदू ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेन्सचे प्रकार : नागरिकांसाठी संपूर्ण माहिती आजकाल वयोमानानुसार दृष्टी कमी होणे आणि मोतिबिंदू तयार होणे हा अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारा सामान्य त्रास आहे. विशेषत: 70 वर्षांनंतर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया ही सुरक्षित आणि परिणामकारक उपाय मानली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी नैसर्गिक लेन्स काढून टाकून कृत्रिम लेन्स बसवली जाते. या लेन्स च्या विविध प्रकारांबाबत बाजारात मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध आहेत. खाली मोतिबिंदू ऑपरेशनसाठी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या सर्व लेन्सची माहिती नागरिकांसाठी सोप्या शब्दांत देत आहोत.

मोनोफोकल लेंस – सर्वाधिक वापरली जाणारी सुरक्षित लेन्स

मोनोफोकल लेन्स हे मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतरचे सर्वात सामान्य पर्यायांपैकी एक आहे. या लेन्समध्ये दूरचे दृश्य उत्तम दिसते, मात्र जवळचे काम करण्यासाठी चष्म्याची मदत घ्यावी लागते. भारतीय कंपन्यांमध्ये Aurolab, Appasamy, Care Group आणि Biotech Visioncare यांच्या मोनोफोकल लेन्स मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर Alcon, Johnson & Johnson, Zeiss आणि Bausch+Lomb यांच्या मोनोफोकल लेन्सला उच्च दर्जाचा पर्याय मानले जाते. भारतीय लेन्सची किंमत साधारण ₹3,000 ते ₹8,000, तर इम्पोर्टेड लेन्सची किंमत ₹12,000 ते ₹25,000 पर्यंत असते.
सावधान ! आयुष्यातल्या वाढत्या ताण आणि समस्यांसाठी तुम्ही पण बाबा किंवा महाराजांकडे जाताय ?

टॉरिक लेन्स – सिलिंडर नंबर असलेल्या रुग्णांसाठी खास

ज्यांच्या डोळ्यात अ‍ॅस्टिग्मॅटिझम (Cylinder नंबर) आहे, त्यांच्या दृष्टीसाठी टॉरिक लेन्स अत्यंत उपयुक्त ठरते. या लेन्समुळे दूरचे दृश्य अधिक स्पष्ट होते. भारतीय कंपन्यांच्या टॉरिक लेन्समध्ये Aurolab Toric आणि Appasamy Toric यांचा समावेश होतो, तर इम्पोर्टेड लेन्समध्ये Alcon AcrySof IQ Toric, J&J Tecnis Toric आणि Zeiss Toric लोकप्रिय आहेत. भारतीय टॉरिक लेन्स ₹10,000 ते ₹20,000, तर Imported टॉरिक लेन्स ₹30,000 ते ₹50,000 या किमतीत उपलब्ध आहेत.

मल्टिफोकल आणि ट्रायफोकल लेन्स – तीनही अंतरावर उत्तम दृष्टी

ज्या रुग्णांना दूर, जवळ आणि मध्यम अंतर तीनही अंतरांवर चांगले दिसावे असे वाटते, त्यांच्यासाठी मल्टिफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स हा प्रीमियम पर्याय आहे. या लेन्समुळे चष्म्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते. मात्र रात्री प्रकाशात हलका ग्लेअर किंवा हॅलो जाणवू शकतो, अशी तक्रार काही रुग्णांमध्ये आढळून येते. भारतीय लेन्समध्ये Aurolab Nebula MF व Biotech Multifocal आणि इम्पोर्टेड लेन्समध्ये Alcon PanOptix, J&J Tecnis Symfony/Synergy तसेच Zeiss AT Lisa या लेन्स सर्वाधिक वापरल्या जातात. भारतीय लेन्स ₹20,000 ते ₹40,000, तर Imported लेन्स ₹60,000 ते ₹1,20,000 या श्रेणीत उपलब्ध आहेत.

टाटा मोटर्सने 2025 मधील आपली सर्वात अपेक्षित SUV Tata Sierra भारतीय बाजारात सादर केली

EDOF लेन्स – नवीन तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय

गेल्या काही वर्षांत EDOF (Extended Depth of Focus) लेन्सला मोठी मागणी आहे. या लेन्स दूर व मध्यम अंतरावर उत्तम दृष्टी देतात आणि हॅलो/ग्लेअर कमी असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा चांगला पर्याय मानला जातो. J&J Tecnis Symfony EDOF आणि Alcon Vivity EDOF या लेन्स या श्रेणीतील प्रमुख आंतरराष्ट्रीय लेन्स आहेत. किंमत साधारण ₹45,000 ते ₹90,000 दरम्यान असते.

75 वर्षांच्या रुग्णांसाठी डॉक्टरांची बहुतेक शिफारस

वय 75 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बहुतेक नेत्रतज्ञ मोनोफोकल किंवा टॉरिक लेन्सचा सल्ला देतात. या लेन्स दृष्टीचे कोंट्रास्ट जास्त स्पष्ट देतात आणि रात्री वाहन चालवताना किंवा प्रकाशात दिसणाऱ्या हॅलोची समस्या कमी होते. वयाप्रमाणे डोळ्यांची जुळवून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने मल्टिफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स प्रत्येकासाठी उपयुक्त ठेल असे नाही. त्यामुळे एकूण स्थिती, बजेट, डोळ्यांचे नंबर आणि डॉक्टरांचा सल्ला विचारात घेऊन निर्णय घेणे योग्य ठरते.

भारतीय आणि Imported लेन्समध्ये मुख्य फरक

भारतीय लेन्स चांगल्या दर्जाच्या आणि किफायतशीर असतात, तर Imported लेन्स त्यांच्या उच्च तंत्रज्ञान, अधिक टिकाऊपणा आणि उत्तम ऑप्टिकल क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत. दृष्टीतील सूक्ष्मता आणि अचूकता हवी असल्यास अनेकजण Imported पर्याय निवडतात.

भारतामध्ये मोतिबिंदू उपचारासाठी वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक लेन्सचे पर्याय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना योग्य लेन्स निवडण्यासाठी पुरेशी माहीती उपलब्ध आहे. योग्य वेळी शस्त्रक्रिया करून योग्य लेन्स बसवल्यास ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा स्वच्छ आणि आरामदायी दृष्टी मिळू शकते.

अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा

Shere me