तेजस विमानाची दुर्घटना . चूक कुणाची ? असा प्रशन आपल्या सगळ्यांना पडला असेल. जाणून घेऊ यात ह्या दुर्घटना महागची संभाव्य करणे.
काय घडल ?
21 नोव्हेंबर 2025 ला अल मकतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट, दुबई येथे दुबई एयर शो 2025 चा आयोजन करण्यात आला होत. ज्या मध्ये बरेच देशातील लढाऊ विमानाने भाग घेतला होता. ह्या शो मध्ये भारतातील स्वदेशी बनावट चा Tejas LCA (Light Combat Aircraft) ने भाग घेतला होता. पण “negative-G turn” घेताना विमानाचा अपघात झाला. ज्या मध्ये पायलट: विंग कमांडर नामन्श स्याल यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पूर्ण देशात ह्या दुर्घटने बदल हळहळ व्यक्त केली जात आहे.
कारण काय?
हि घटना घडल्या पासून वेगवेगळे तर्क आणि निकर्ष लावले जात आहेत. भारतीय वायुसेनेने (IAF) आणि दुबईतील अधिकार्यांसोबत जांच कमिटी स्थापन केली आहे. काही तज्ञांच्या मते कमी उंचीवर केलेले एरोबॅटिक मोव्ह (negative-G turn) पुनर्प्राप्त करण्यासाठी पुरेशी उंची नव्हती. HAL (Hindustan Aeronautics Limited) ज्यांनी हा विमान तयार केला आहे म्हणते की हा अपघात एक “isolated occurrence” आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना सामान्य ऑपरेशनमध्ये वारंवार होणारी समस्या नाही, तर “विशिष्ट परिस्थितीचे” परिणाम आहे.
खर कारण कळायला बरेच दिवस लागतील कारण चौकशी ही “प्रोटोकॉल”नुसार केली जात आहे ज्यात पायलटचे वर्कलोड, विमानाचे मर्मत इतिहास, उड्डाणाच्या परिस्थिती (मॅन्यूव्हर, गीर्स, गती-वित्त) इत्यादी गोष्टी तपासल्या जातील.
हे आहेत पर्याय ज्यापासून तुम्ही सोशल मीडिया मधून पैसे कमावू शकता.
हि घटना थांबवता आली असती का ?
तेजस विमानाची हि पहिलीच दुर्घटना नाही. १२ मार्च २०२४ ला पण जैसलमेर , राजस्थान मध्ये प्रशिक्षण दरम्यान अपघात झाला . त्या वेळेस पायलट ने लगेच विमानातून स्वतःला बाहेर काढला म्हणून कुठली जीवित हानी झाली नाही. IAF कडून त्या अपघाताची चौकशी चालू आहे. चौकशी दरम्यान असा समाजला कि इंजिन समस्या किंवा देखभाल संबंधी त्रुटी झाली आहे. ह्या विमानाचा इंजिन एक अमेरिका कंपनी बनवते GE Aerospace.
गुंड अकू यादव – २०० महिलांवर अत्याचार – संतापलेल्या महिलांनी त्याच्यावर कोर्टातच हल्ला करून केली हत्या
जर दीडवर्षा पूर्वी अपघात झाला असेल तर त्या मधील त्रुटी अजून दूर का केल्या गेल्या नाहीत. का नेहमी प्रमाणे कंपनीना वाचवण्यासाठी पायलट वर दोष टाकून सगळ शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार. जर पहिलाच अपघाताच्या वेळेस समजलं आहोत कि इंजिन मध्ये अडचण आहे. तर अता झालेल्या अपघाताच्या चौकशी साठी GE Aerospace हि कंपनी सहभागी का होणार आहे ?
निष्कर्ष
प्रत्येक वेळेस पायलट वर दोष टाकून चालणार नाही. कारण आपल्या देशात आधीच लढाऊ विमानाची कमतरता आहे. आपल्याला जर सक्षम देश बनायचं असेल तर ? आपल्याला आपल्या धोरणांन मध्ये बदल करायला हवा. ज्यांची चूक आहे त्यांना शिक्षा देणे गरजेच आहे.
अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा